Creation Science Information & Links!
स्तोत्रसंहिता 1, 51, 100 & 150
Psalms 1 • 51 • 100 • 150 - in Marathi
स्तोत्रसंहिता (Psalm) 1

1 माणसाने जर वाईट लोकांचा सल्लामानला नाही, तो पापी लोकांसारखा राहिला नाही आणि देवावरविश्वास न ठे वणाऱ्या लोकांबरोबर राहाणे त्याला आवडले नाही तर तो माणूस खरोखरच सुखी होईल.
2 चांगल्या माणसाला परमेश्वराची शिकवण आवडते तो त्याबद्दल रात्रंदिवस विचार करत असतो.
3 त्यामुळे तो माणूस ओढ्याच्या कडेला लावलेल्या झाडासारखा शक्तिशाली होऊ शकतो तो योग्यवेळी फळे येणाऱ्या झाडासारखा असतो तो पाने असलेल्या व न मरणाऱ्या झाडासारखा असतो तो जे काही करतो ते यशस्वी होते.
4 परंतु वाईट लोक असे नसतात ते वाऱ्यावर उडून जाणाऱ्या फोलपटासारखे असतात.
5 न्यायालयातील खटल्याचा निवाडा करण्यासाठी जर चांगले लोक एकत्र आले तर वाईट लोकांना अपराधी ठरविले जाईल ते पापीलोक निरपराध ठरविले जाणार नाहीत.
6 का? कारण परमेश्वर चांगल्यांचे रक्षण करतो आणि वाईटाचे निर्दालन करतो.

 

स्तोत्रसंहिता (Psalm) 51

1 देवा, माझ्यावर दया कर, तुझ्या अतिशय प्रेमळ दयाळूपणाने आणि तुझ्या कृपेने माझी पापे पुसून टाक.
2 देव माझे अपराधीपण खरवडून घालवून टाक. माझी पापे धुऊन टाक, मला पुन्हा स्वच्छ कर.
3 मी पाप केले हे मला माहीत आहे. ती पापे मला नेहमी दिसतात.
4 तू ज्या गोष्टी चुकीच्या आहेत असे सांगतोस त्याच मी केल्या. देवा मी तुझ्याविरुध्द पाप केले. मी त्या पापांची कबुली देतो म्हणजे लोकांना कळेल की मी चुकलो आणि तू बरोबर होतास. तुझे निर्णय योग्य आहेत.
5 मी पापातच जन्मलो आणि पापातच माझ्या आईने माझा गर्भ धारण केला.
6 देवा, मी खरोखरच प्रामणिक व्हावे असे वाटत असेल तर शहाणपण माझ्या आत खोलवर ठेव.
7 मला शुध्द करण्यासाठी तू एजोब वनस्पती वापर आणि विधी कर. मला आंघोळ घाल म्हणजे मी बफर्पोक्षा शुभ्र होईन.
8 मला सुखी कर, पुन्हा आनंदी कसे व्हायचे ते मला सांग. तू जी हाडे चिरडून टाकलीस ती पुन्हा आनंदी होऊ दे.
9 माझ्या पापांकडे बघू नकोस, ती पुसून टाक.
10 देवा माझ्यात पवित्र ह्दय निर्माण कर. माझा आत्मा पुन्हा बलशाली कर.
11 मला दूर लोटू नकोस आणि तुझा पवित्र आत्मा माझ्यातून काढून घेऊ नकोस.
12 मी तुझ्या मदतीमुळे आनंदी झालो, मला पुन्हा तुझा आनंद दे, माझा आत्मा सबळ कर आणि तुझ्या आज्ञा पाळणारा कर.
13 पापी लोकांनी कसे राहावे अशी तुझी इच्छा आहे त्याप्रमाणे मी त्यांना शिकवीन. आणि ते तुझ्याकडे परत येतील देवा, मला खुनी समजू नकोस.
14 देवा, तूच माझा त्राता आहेस. तू किती चांगला आहेस ते सांगणारे गाणे मला गाऊ दे.
15 प्रभु, मी माझे तोंड उघडीन आणि तुझे गुणगान करीन.
16 तुला बळी नको आहेत. तुला नको असणारे बळी मी देणार नाही.
17 देवाला हवी असलेला बळी म्हणजे विदीर्ण झालेला आत्मा होय. देवा, तू चिरडले गेलेल्या आणि विदीर्ण झालेल्या ह्दयाकडे पाठ फिरवणार नाहीस.
18 देवा, तू सियोनाशी चांगला आणि दयाळू राहा.यरुशलेमच्या भिंती बांध.
19 नंतर तू चांगले बळी उपभोगू शकशील आणि होमार्पणे ही तू उपभोगशील. आणि लोक पुन्हा तुझ्या वेदीवर बैलांचा बळी देतील.

 

स्तोत्रसंहिता (Psalm) 100

1 हे पृथ्वी, परमेश्वरासाठी गा.
2 परमेश्वराची सेवा करताना आनंदी राहा. परमेश्वरासमोर आनंदी गाणी घेऊन या.
3 परमेश्वरच देव आहे हे लक्षात घ्या. त्यानेच आपल्याला निर्माण केले. आपण त्याची माणसे आहोत. आपण त्याची मेंढरे आहोत.
4 त्याच्या शहरात धन्यवादाची गाणी घेऊन या. त्याच्या मंदिरात स्तुतिगीते घेऊन या. त्याला मान द्या. त्याच्या नावाचा जयजयकार करा.
5 परमेश्वर चांगला आहे. त्याचे प्रेम चिरंजीव आहे. आपण त्याच्यावर कायम विश्वास टाकू शकतो.

 

स्तोत्रसंहिता (Psalm) 150

1 परमेश्वराची स्तुती करा देवाची त्याच्या मंदिरात स्तुती करा. त्याच्या सामर्थ्याची स्वर्गात स्तुती करा.
2 देव ज्या महान गोष्टी करतो त्याबद्दल त्याची स्तुती करा. त्याच्या सर्व मोठेपणाबद्दल त्याची स्तुती करा.
3 तुतारी आणि कर्णा वाजवून देवाचे गुणगान करा. सतारीवर आणि वीणेवर त्याचे गुणगान करा.
4 डफ वाजवून आणि नाचून देवाची स्तुती करा. तंतुवाद्यावर आणि बासरीवर त्याचे गुणगान करा.
5 जोर जोरात टाळ वाजवून देवाची स्तुती करा. झणझणणाऱ्या झांजांवर त्याचे गुणगान करा.
6 स्तुती कर. परमेश्वराची स्तुती कर.


स्तोत्रसंहिता 1 • 51 • 100 • 150 · मराठी
http://www.creationism.org/marathi/saPs1_51_100_mr.htm

मुख्य:  Marathi
www.creationism.org